आमच्या विषयी
काळ बदलतो आहे.. तसा समाजही संक्रमण करतो आहे..
यातून मराठा समाज बाजूला कसा असेल..? शेती बरोबरच
आधुनिक तंत्रज्ञान,उच्चशिक्षण, संशोधन, उद्योग या क्षेत्राची कास
मराठा बांधवांनी धरली आहे.. आपला समाज उन्नत होतोय पण
त्याबरोबरच विवाहासाठी अनुरूप वधू किंवा वर यांची निवड हा एक
काळजीचा विषय बनत चालला आहे.. त्यासाठीच आम्ही एक पाऊल टाकल आहे..
मराठा विवाह दरबारच्या रुपानं..!!!! विश्वास हेच आमच वैशिष्ट्य...!!!
मराठा समाजातील वधू-वरांच्या पसंती नुसार विवाह जमवणारी महाराष्ट्रातील ही एक नामांकित संस्था आहे...
'योग्य वेळ आल्यानंतर विवाह जमतो' ही संकल्पना
आता कालबाह्यः झाली आहे.. शिक्षणामुळे मुले-मुली
भवितव्याबद्दल जागरूकपणे विचार करू लागल्या आहेत..
त्यांना आपल्या भविष्यातील स्वप्नांना साजेसा..
आपल्या योग्यतेचा.. आवडीचा.. अनुरूप जोडीदार हवा आहे..
तो मिळवून देण्याचे कार्य मराठा विवाह दरबार यशस्वीरित्या करत आहे...
पुणे शहरातील मध्यवर्ती नारायण पेठेत 'मराठा विवाह दरबार'चे प्रशस्त कार्यालय आहे..
या ठिकाणी उपवर वधू-वरांना व पालकांना एकमेकांना भेटी-गाठीचे प्रयोजनसुद्धा केले जाते..
तसेच दर २ ते ३ महिन्यांनी पुणे शहरात राज्यस्तरीय उच्चशिक्षित वधू-वर मेळाव्याचे
यशस्वी आयोजन करण्याची मराठा विवाह दरबारची परंपरा आहेच..
या माध्यमातून आम्ही अनेक विवाह जमवले आहेत... जमवत आहोत..
www.marathavivahdarbar.com या आधुनिक वेबसाईटच्या माध्यमातून आपण
नवनवीन विवाहइच्छुक मुला-मुलींचे फोटो व संपूर्ण बायोडाटा घरबसल्या जगात कोठेही पाहू शकता..
तसेच नवनवीन मुला-मुलींच्या याद्या इमेल/पोस्टाने वर्षभर घरपोच मिळण्याची विशेष सुविधा आहेच..
त्यामुळे आपला जोडीदार संशोधनासाठीचा बहुमूल्य वेळ आणि पैसा याची मोठ्या प्रमाणावर बचत होत आहे..
तरी आपण मराठा विवाह दरबारचे सभासद होऊन या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा..
मनातील स्वप्नांना साजेसा आयुष्याचा साथीदार शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांना.. आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!!!!
भास्कर तावरे व परिवार.